Monday , September 21 2026
Breaking News

भोई गल्लीत दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना

Spread the love

बेळगाव : शहरातील भोई गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना कार्यक्रम आमदार, गल्लीतील पंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी आपल्या भाषणात, एकीचे बळ मोठे असून महिलांनी एकजुटीने कार्य करीत राहावे. मंडळातील सर्व सदस्यांनी माता दुर्गेप्रमाणे शूर बनून दुष्ट प्रवृत्तीविरोधात कार्य कराव, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा शिंदे यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

याप्रसंगी दुर्गा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना सुतार, उपाध्यक्षा प्रियांका कामाणे, सचिव स्वाती गाडेकर, उपसचिव हेमा उदगडगी, खजिनदार अश्‍विनी कामू, उपखजिनदार नलिनी कामाणे, सदस्या प्रभा भातकांडे, चंदा भातकांडे, रेणुका उदगडगी, मल्लव्वा भातकांडे, रेखा उदगडगी, वंदना जाधव, विजया कित्तूर, पंच भाऊ उडगडगी, सुरेश भातकांडे, प्रभाकर सुतार, जॉन फर्नांडीस, राजेश कामणे आदींसह महिला मंडळाच्या सदस्या आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *