गर्लगुंजी (सागर पांडुचे) : दिनांक 30 जुन रोजी झालेल्या बरगांव सीआरसी अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धा गर्लगुंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी या शाळेच्या विद्यार्थीनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
वैयक्तिक तसेच सांघिक खेळात प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे
खो-खो: मराठी मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले तसेच बिदरभावी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कब्बडी : कब्बडी स्पर्धेत कुप्पटगिरी शाळेने विजेतेपद पटकावले तसेच गर्लगुंजी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
थ्रो बॉल : थ्रो बॉल स्पर्धेत मराठी मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. तसेच निडगल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
व्हॉलीबॉल : व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी संघ विजयी ठरला तसेच निडगल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.