रामनगर : गोवा- कर्नाटक हद्दीतील अनमोड घाटात दरड कोसळून आज वाहतूक ठप्प झाली.
आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान सकाळी 9 च्या सुमारास रामनगर मार्गे गोव्याला जाणाऱ्या महामार्गावरील अनमोड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
कांही छायाचित्रे…