Friday , November 6 2026
Breaking News

पीएसआय पदांच्या बेकायदेशीर भरती एडीजीपी अमृत पॉल यांना अटक

Spread the love

बेळगाव : एडीजीपी अमृत पॉल यांना सीआयडी पोलिसांनी 545 पीएसआय पदांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणी अटक केली आहे.

भरती विभागाचे एडीजीपी असलेले अमृत पॉल यांच्यावर पीएसआय पद भरती परीक्षेच्या बेकायदेशीर प्रकरणात ओएमएमआर शीट दुरुस्त केल्याचा आरोप होता.
या प्रकरणी एडीजीपी अमृत पॉल यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यांनी 25 पीएसआय पदांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये घेतले आणि त्यांना त्यांच्या कार्यालयातील ओएमएमआर शीटमध्ये बदल करण्याची परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर अमृत पॉलची सीआयडी अधिकाऱ्यांनी तीन वेळा चौकशी केली. आज चौथ्यांदा चौकशीसाठी बोलावलेल्या सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर पॉलला अटक केली. अमृत ​​पॉल विरोधात बरेच पुरावे असल्याची माहिती मिळाली आहे.
एडीजीपी अधिकाऱ्याला सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *