संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी धोधो बरसत निरोप घेताना दिसला. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (बळीराजा) खूष झालेला दिसला. खरीपाला पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. यंदा शेतकऱ्यांना मृगाने दगा दिला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या १५-२० दिवस मागे पडल्या. आर्द्रा नक्षत्र काळात शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पेरणी नंतर आर्द्रा पावसाने दडी मारल्याने शेतकरी काळजीत पडला होता. शेतकऱ्यांतून दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांची चिंता दूर केलेली दिसली. सकाळी ५ वाजता सुरु झालेला पाऊस दुपारी तीन वाजेपर्यंत चांगलाच बरसल्याने कांहीं काळ जनजीवन विस्कळित झालेले पहावयास मिळाले. सखल भागात पावसाचे पाणी साचून राहिले असून अंबिका नगर तसेच गावातील कच्चे रस्ते आणखी खराब झालेले दिसत आहेत.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …