संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संकेश्वरतील प्रसिद्ध पुरोहित वामन पुराणिक यांना शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वामन पुराणिक म्हणाले आपल्या गुरुजनांविषयी नेहमीच आदरभाव ठेवा. कोणाचही मन दुखवू नका. कारण एखाद्याचं मन दुखावले गेल्यामुळे वाईट वाटत्ं.त्यापेक्षा एखाद्याचं भलं करा. तो आनंदी होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पतंजली योग समितीच्या योगसाधकांनी योगशिक्षक परशुराम कुरबेट, पुष्पराज माने यांचा सत्कार केला. यावेळी श्रीमती प्रमिला देसाई, सौ. शिवलीला कुंभार, सौ. शैलाजा जेरे, अंजली मॅडम, नेत्रा जरळी, गीता हेद्दुरशेट्टी, गीता काकडे, मीनाक्षी सांबरेकर, सौ. विजया ढंग, रावसाहेब कंबळकर, नागराज नाईक, ए. एस. शिरकोळी योगसाधना उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लाप्पा कुरबेटी यांनी केले. आभार श्रीनिवास कोळेकर यांनी मानले.