संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा वाढदिवस भक्तगणांनी श्रींच्या आशीर्वादाने भक्तीमय वातावरणात साजरा केला. आज दिवसभर भक्तगणांनी श्रींची प्रत्यक्ष भेट घेऊन श्रींना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सविनय शुभेच्छा प्रदान केल्या.सोबत श्रींचा आर्शीवादही घेतला. श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी भक्तगणांच्या प्रेमाने भारावून गेलेले दिसले. श्रींच्या वाढदिवस सोहळ्यात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, सभापती सुनिल पर्वतराव नगरसेवक नंदू मुडशी, कुमार बस्तवाडी, प्रदीप माणगांवी, संतोष कमनुरी, किरण नेसरी, सागर जकाते, अनिल संसुध्दी, प्रदीप कर्देगौडा, सोनू बेळवी, चेतन बशेट्टी, आणप्पा संगाई, गणपू गडकरी, विरुपाक्ष मलकट्टी, उमेश फडी, राजू जरळी, अभिजित कुलकर्णी, राजेश गायकवाड, जयप्रकाश सावंत, अविनाश नलवडे, सॅंडी बांबरे, आकाश खाडे, निखिल शिरकोळी, आदर्श गड्डी, सनी शिरकोळी, किरण शिरगांवी, राजू नडगदल्ली, मठ व्यवस्थापक अर्जुन कानवडे, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री शंकराचार्य कृपा आर्शीवाद राहू दे….!
संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी म्हणाले, समस्त:भक्तगणांवर श्री शंकराचार्य कृपाशीर्वाद राहू दे. भक्तगणांच्या प्रेमाने आपण भारावून गेलो आहोत. समस्त भक्तगणांच्या सुख शांती आणि समाधानकरिता आपला आशीर्वाद कायम असल्याचे श्रींनी सांगितले.