खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या आनंदगड विद्यालयाचे कन्नड शिक्षक आर. बी. तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन सिध्दोजी पाटील होते. तर अतिथी म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव विक्रम पाटील, भुवराह अॅग्रीकल्चर कंपनीचे सीईओ प्रविण पाटील, तसेच वक्ते म्हणून निवास धोत्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या स्वागतगीताने झाली.
प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एन. एम. देसाई यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सचिव विक्रम पाटील यांच्याहस्ते सेवानिवृत्त शिक्षक आर. बी. तेगूर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळा सुधारणा कमिटी व विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक एन. एम. देसाई व शिक्षकवर्ग यांच्या हस्ते आर. बी. तेगुर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हायस्कूलच्यावतीने, मित्र मंडळ, आजीमाजी विद्यार्थी वर्गाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी तेगुर सरांच्या शिक्षकीसेवेबद्धल उपस्थित मान्यवरांची गुणगान करणारी भाषणे झाली. यावेळी सत्कार मुर्तींनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष रमाकांत पाटील, सदस्य प्रविण पाटील, टी. वाय. पाटील, मधुकर पाटील, अर्जुन पाटील, काळसेकर, भुज गुरव, गजानन पाटील व शिक्षण प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती एम. आय. रोटी यांनी केले. तर आभार पी. आर. पाटील यांनी मानले.