Thursday , September 19 2024
Breaking News

कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या बैठकीत ‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना!

Spread the love

कोल्हापूर – ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, रुग्णालये यांच्यासह ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी घेतले आहे. त्यामुळे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ भारतात उभी केली जात आहे. जागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. तरी याच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलाल’सक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

या बैठकीत ‘हलाल जिहाद?’ या ग्रंथाचे लेखक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी उपस्थितांना ‘हलाल सर्टिफिकेशन’ याविषयी सविस्तर माहिती देऊन त्याच्या परिणांविषयी अवगत केले. यानंतर सर्वांनीच उत्स्फूर्तपणे हलालसक्ती संदर्भात जागृती करण्यासाठी ‘कृती समितीची स्थापना करूया’, अशी एकमुखी मागणी केली. ही समिती विविध समाजातील सर्व स्तरांतील राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना आणि संघटनांना सहभागी करून घेऊन ‘मॉल्स’, दुकाने, नागरिक, विविध संघटना, व्यापारी, उद्योजक, तसेच समाजातील प्रत्येक घटकांमध्ये ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात जागृती करणार आहे. या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, उद्योजक यांचे प्रतिनिधी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *