नागरिकांची होते गैरसोय
निपाणी(वार्ता) सौंदलगा गावाबाहेर पूर्वेकडे असलेल्या गणेश देवस्थान (साळुंखेवाडी) पाटी ते लोहारकी शेतीपर्यंत सरकारी पाणंद रस्ता अतिक्रमण हटवावे अशा मागणीची निवेदन ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार, ग्रामतलाठी व ग्रामपंचायत प्रशासनाला मंगळवारी (ता.२३) देण्यात आले.
सौंदलगा गावाजवळ गणेश देवस्थान पाटी ते सर्वे नंबर २४ व सर्वे नंबर २५ दोन्हीच्या मधील सरकारी नोंद असलेला पाणंद रस्ता खुला करावा सध्या हा रस्ता लोकांना येण्याजाण्यासाठी गैरसोयीचा झालेला आहे. या पाणंद रस्त्यावरून बरेच शेतकरी ये जा करतात. सध्या पाणंद रस्ता बंद आहे. याची चौकशी करून सदर पाणंद रस्ता येणे जाण्यासाठी खुला करण्यात यावा. व या मार्गावर असलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत अशा प्रकारची निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे, ग्राम तलाठी एस. एम. पोळ ग्रामपंचायत विकास अधिकारी जावेद पटेल यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार कारंडे यांनी अतिक्रमण हटवणेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम पाटील, शिवाजी पाटील, विजय पाटील, संग्राम पाटील, आप्पासाहेब कारंडे, विशाल शेळवाडे, सुनील पाटील, राजेंद्र मुरचिटे, अनिल मुरचिटे, सदाशिव मोरे, संजय मोरे, सुरज मोरे, गंगाराम शिंत्रे, आनंदा पाटील, हरी पाटील, सतीश पाटील, महावीर कारंडे, गंगाधर शिंत्रे, नंदकुमार काळुगडे, सुरेश काळुगडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.