Saturday , October 19 2024
Breaking News

’अरिहंत’मध्ये इराकच्या बाळाला जीवदान!

Spread the love

 

बेळगावात शस्त्रक्रिया : डॉ. एम. डी. दीक्षित यांना यश
निपाणी (वार्ता) : अवघ्या दोन वर्षाच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच धक्का बसलेल्या पालकांनी सातासमुद्रापार इराकहून बेळगाव गाठले. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शखक्रिया करून त्या चिमुकल्याला जीवदान दिले. त्यासाठी बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांचे सहकार्य लाभले.
इराकमधील गेव याच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांनंतर त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्या पालकांनी इराकमधील डॉक्टरांची भेट घेऊन गेथच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यानंतर तेथील डॉक्टरांनी गेथच्या शस्त्रक्रियेसाठी भारत व तुर्की या दोन देशांची नावे सुचविली होती. त्यानंतर गेथच्या पालकांनी भारताची निवड करून डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडे शस्त्रक्रिया करवून घेण्याचे ठरविले. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी गेथवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले.
गेथ हा इराकमधील बगदाद येथील रहिवासी असून मेहमूद हुसेन हमीद अहमद व निंदा अब्दुल सत्तार असे त्याच्या पालकांचे नाव आहे. गेथच्या हृदयाला जन्मापासूनच छिद्र होते. मात्र त्याच्या जन्मानंतरच्या तीन महिन्यांनंतर त्याला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. दरम्यान, इराकमध्ये हृदय शस्त्रक्रियेबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने तेथील डॉक्टरांनी गेथवर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारत किंवा तुर्की या दोन देशांची नावे सुचविली. त्यानंतर पालकांनी याबाबत कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळीशी चर्चा केली. दरम्यान गेथचे वडील मेहमूद हुसेन हमीद अहमद यांचे इराक येथील मित्र बेंगळूरला वास्तव्यास आहेत. त्यांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. यानंतर गेथसह पालक इराक येथून बेंगळूरमार्गे गुरुवारी (ता. 6) ऑक्टोबर रोजी सायंकाळी बेळगाव येथे दाखल झाले. त्यांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांची भेट घेतली. यानंतर शनिवारी (ता. 8) रोजी सकाळी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गेथवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेथच्या पालकांनी हॉस्पिटल व्यवस्थापन कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. हॉस्पिटलचे संचालक अभिनंदन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून गेथच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉ. एम. डी. दीक्षित व त्यांच्या टीमचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *