निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसानिमित्त येथील आंबेडकर नगरात मंगळवारी (ता.१५) घोडागाडी आणि बैलगाडी शर्यती पार पडल्या. त्यामध्ये बैलगाडी शर्यतीत आडी येथील पल्लू हरेर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १०००१ रुपयांचे बक्षीस व निशान मिळवले.
या शर्यतीत स्वप्निल चौगुले (चिखलव्हाळ) यांच्या बैलगाडीने द्वितीय तर राजू पोकळे (आडी) यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकाविला त्यांना अनुक्रमे ७००१, ४००१ रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
घोडागाडी शर्यतीमध्ये शिवाजी कांबळे (छबी), मच्छिंद्र कमते, शिवाजी कांबळे, तुहीत पठाण (सर्व निपाणी) यांच्या गाड्यांनी प्रथम ते चतुर्थ क्रमांकाची ७००१, ४००१, ३००१ आणि २००१ रुपयांची बक्षीसे पटकाविलली.
शर्यतीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण उरूस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, सभापती डॉ. जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संग्रामसिंह देसाई -सरकार, रणजीतसिंह देसाई -सरकार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन कौंदाडे, तुकाराम कोळी, संभाजी मुगळे, अतिश शिंदे, विश्वास माळी, श्रीकांत माळगे, रफिक मुल्ला, धर्मा कांबळे यांच्यासह उरूस आणि शर्यती कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.