Sunday , July 26 2026
Breaking News

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात निपाणीचा झेंडा; निपाणी तालुक्याचा ९५.८८ टक्के निकाल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी (ता.२३) जाहीर झाला आहे. त्यामध्ये निपाणी तालुक्याने चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये केएलई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी नम्रता भारत माने व श्रावणी परशुराम पाटील या दोघींनी ९९.२% गुण मिळवत तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. कारदगा येथील येथील डी.एस. नाडगे हायस्कूलची विद्यार्थिनी अक्षता रामचंद्र जाधव हिने ९८.७२ टक्के गुण घेऊन द्वितीय तर हंचीनाळ (केे.एस.) येथील कित्तूर राणी चन्नमा निवासी स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सिद्धाप्पा वारी, निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी विघ्नेश मनोहर हरदारे व निपाणी एस.बी.एस. कन्या शाळेची विद्यार्थिनी संस्कृती प्रसाद गुजर या तिघांनी ९८.८ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये निपाणी रेंजमध्ये येणाऱ्या एकूण ५४ हायस्कूल पैकी २१ स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. यातील टॉपर विद्यार्थ्यांपैकी पहिले दोघे इंग्लिश माध्यमाचे तर द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी ही मराठी तर तृतीय क्रमांकामध्ये आलेले तीन विद्यार्थी हे इंग्लिश इंग्रजी, कन्नड, मराठी माध्यमाचे आहेत.

निपाणी शैक्षणिक तालुक्याचा निकाल ९५.८८ टक्के इतका लागला. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी १७५४ मुले तर १८३३ मुली अशा एकूण ३६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६६९ मुले व १८१८ मुली असे एकूण ३४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांच्यापेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.५५ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ९५.१५टक्के आहे.
——————————————————————–
‘दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निपाणी गटशिक्षण अधिकारी कार्यालयातर्फे विविध अभ्यासक्रम राबविण्यात आले. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांचे कष्ट यामुळेच निपाणी तालुक्यातील दहावीचा निकाल चांगला लागला आहे. या पुढील काळातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.’
महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *