Thursday , April 23 2026
Breaking News

लेटेक्स कॉलनीतील जलकुंभावर उगवले गवत; नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पण लेटेक्स कॉलनी जवळील बदलमुख रोडवरील सीबीएससी स्कूलसमोरील जलकुंभाची दुरावस्था होत आहे. सध्या या जलकुंभाच्या परिसरात झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून जलकुंभावर चक्क गवत उगवले आहे. पण त्याच्या स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या प्रभागात दोन नगरसेवक असूनही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नगरपालिकेच्या दिव्याखाली अंधार असणारा कारभार उघड झाला आहे.
लेटेक्स कॉलनी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी हा जलकुंभ बांधण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात या परिसरात स्वच्छतेस हे इतर कामे सुरू होती. आता सभागृह अस्तित्वात नसून कारवार आयुक्तांच्या हाती आहे. हा भागात मोठी लोकवस्ती असूनही जल कुंभाच्या परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत नागरिकासह सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाला कळवूनही कोणतीच हालचाल झालेली नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास हा जलकुंभ कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून परिसर गलिच्छ बनत चालला आहे. अशा परिस्थितीत जलकुंबातील पाणी नागरिकांच्या नळांना सोडले जात आहे. त्याचा नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने जलकुंभ परिसराची स्वच्छता करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याची मागणी ४ -जे मानव अधिकार संघटनेचे सदस्य सचिन पवार यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्न समारंभ, वास्तुशांतीमुळे फुलांच्या दरात तेजी

Spread the love  मोगरा १००० रुपये किलो : गजऱ्याचे दरही दुप्पट निपाणी (वार्ता) : अक्षय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *