Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये आज वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारी बेळगाव शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार वळिवाचा पाऊस झाला. दुपारच्या सुमारास अचानक आकाश काळ्या ढगांनी व्यापून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागली.उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या जनतेला या पावसाने गारवा दिला असला, तरी सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून सार्वजनिक वाहतुकीवरही काही काळ मर्यादा आल्या होत्या.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *