Monday , August 31 2026
Breaking News

सामाजिक बांधिलकीचे महत्व प्रत्येकाने जाणून घ्यावे : रामदासी महाराज

Spread the love

 

बेळगांव : सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रात बेळगाव शहराचे आपले खास वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरात आजही अनेक सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे आपले कार्य करत आहेत.सामाजिक बांधिलकीचे महत्व जाणून प्रत्येकाने राष्ट्राचा कणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री. रामदास महाराज यांनी बोलताना केले.

मुक्तिधाम सेवासुधारणा मंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला श्री. रामदास महाराज यांच्यासह ब्ल्यू स्मार्ट एल्व्हेटर्स संचालक राहुल महालंक, साडी कारखानदार विल्सन वेगस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी शहापूर स्मशानभूमीत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ नागरिकांना बसण्यासाठी बाकांची सोबत त्याचबरोबर भव्य अग्नि मंत्र उभारुन दिला आहे. घुमटमाळ मारुती मंदिर अध्यक्षपदी निवड झालेले कुलदीप भेकणे, यांच्यावतीने त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची शेगडी उभारुन दिली आहे. वेदांत सोसायटीचे नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर सायनेकर यांच्याकडून मंडळाला सर्वतोपरी सहकार्य मिळत असते. याबद्दल नेताजी जाधव, ज्ञानेश्वर सायनेकर, कुलदीप भेकणे तसेच श्री रामदास महाराजांचा मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने राहुल महालंक, विल्सन वेगस, संदीप खन्नुकर, हिरालाल चव्हाण, ईश्वर जोरापूरे, हरीश दिवटे, उमेश राऊळ यांच्या हस्ते, शाल, पुष्प भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना रामदासी महाराज म्हणाले, बेळगावला सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक कार्याचा थोर वसा लाभला आहे. अनेक थोर विद्वान पुरुषांनी बेळगाव शहरात वास्तव्य केले आहे. थोर समासुधारकांचा वसा जपण्यासाठी तरुण पिढीने आज सज्ज झाले पाहिजेत. नव्या पिढीमध्ये जागृती करण्यासाठी नवे क्रियाशील उपक्रम राबविले गेले पाहिजेत असे रामदासी महाराज यांनी सांगितले.

नेताजी जाधव म्हणाले, सामाजिक कार्यातून समाधान मोठे असते. थोर पुरुषांचे जीवनकार्य प्रत्येकाला जीवनात सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारे असतात. प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक कार्यात सहभाग दर्शविला तर अनेक विधायक कार्य पार पडतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.ज्ञानेश्वर सायनेकर यांनीही यावेळी समयोचित विचार मांडले.
उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी केले. प्रास्तावीक संदिप खन्नुकर यांनी तर आभारप्रदर्शन हिरालाल चव्हाण यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *