Tuesday , August 18 2026
Breaking News

मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगावतर्फे लक्ष्मी पाटील हीचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळळूर चा 2025 -26 चा निकाल 100% लागल्यामुळे व लक्ष्मी पाटील या विद्यार्थिनींने दहावीच्या परीक्षेत 606 गुण (96.96%) मिळवून बेळगाव तालुक्यामध्ये चौथा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव तर्फे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन त्याचप्रमाणे शाळेचा 100% निकाल लागल्यामुळे मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या यशाबद्दल संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर आणि सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी विशेष अभिनंदन करून उज्वल भविष्य साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या यशामागे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर तसेच प्रभारी मुख्याध्यापक श्री. एन. वाय. मजूकर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल हायस्कूल व सर्व शिक्षकांचे त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थिनी लक्ष्मी पाटील हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *