Tuesday , June 23 2026
Breaking News

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; तेलंगणा येथील धक्कादायक घटना

Spread the love

 

नल्लागोंडा (तेलंगणा) : तेलंगणातील नल्लागोंडा शहरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांमुळे सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

मृतांपैकी दोघांची ओळख सुलतान आणि हसीना अशी झाली आहे. सुलतान हे प्रकाशम बाजार परिसरात बॅगचे दुकान चालवत होते, तर हसीना या खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. घरात सापडलेल्या अन्य दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून ते त्यांच्या मुलांचे की इतर नातेवाईकांचे आहेत, याबाबत तपास सुरू आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित घर गेल्या काही दिवसांपासून बंद होते आणि कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. दुर्गंधी वाढल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आतून बंद असलेला दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता चारही मृतदेह आढळून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे जप्त केले असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून या घटनेमुळे नल्लागोंडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

भरधाव स्कॉर्पिओ झाडाला धडकली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर

Spread the love  रांची : झारखंडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *