Monday , August 17 2026
Breaking News

बेळगाव उत्तर मतदार संघातील विशेष सघन पुनरावलोकन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक भाजप नेते किरण जाधव यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार तथा पक्षाचे सरचिटणीस पी. राजू आणि रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विशेष सघन पुनरावलोकन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार जनजागृती, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि निवडणूक प्रक्रियेची अधिक बळकटी यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली. मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली.

ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर समन्वय वाढवून एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *