Monday , June 22 2026
Breaking News

हेस्कॉमचे खाजगीकरण झाल्यास गंभीर परिस्थिती

Spread the love

 

राज्यध्यक्ष राजू पोवार; रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी बेंगलोरला रवाना

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या विरोधात आहे. त्यामुळे खाजगीकरणाच्या प्रणालीला विरोधात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेंगलोर येथील फ्रीडम पार्क येथे आंदोलन करण्यासाठी सोमवारी (ता.२२) रवाना झाले
राजू पोवार म्हणाले, विजेच्या खाजगीकरणामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर आणि विविध सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, वीज दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकावर आर्थिक भार पडू शकतो. हेस्कॉम वीज वितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही कारणास्तव वीजेचे खाजगीकरण करू नये. याशिवाय सर्वेअरांची रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करावी. जनहित लक्षात घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी बेंगलोर येथे टाटा कंपनीचढ्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी बबन जामदार-मानकापूर, चिनू कुळवमोडे-मत्तीवडे, बाबासाहेब पाटील -आडी, सुनील पाटील-चांद शिरदवाड, एकनाथ सादळकर- ढोणेवाडी, आनंदा गायकवाड- हंचिनाळ, कालगोंडा कोटगे- बेनाडी, अमित चौगुले- जत्राट, मधुकर पाटील- भिवशी, संजय जोमा-शिवापूरवाडी, आप्पासो केरके- आडी, सर्जेराव हेगडे-निपाणी, संजय चौगुले- बारवाड, रमेश मोरे-मानकापूर, विजय हरदारे- जत्राट,अनिल घाटगे- ढोणेवाडी, वैभव घाटगे-ढोणेवाडी यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना

Spread the loveमिनाक्षी पाटील; बोरगाव येथे स्वयंपाक गॅसचे वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *