Monday , August 17 2026
Breaking News

अक्कोळ रोडवर शिवशंभो ग्रुपच्या नामफलकाचे अनावरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील निपाणी -इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ रोडवर शिव शंभो ग्रुपच्या नाम फलकाच्या अनावरण सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी सोमनाथ उर्फ पप्पू शिंदे यांनी स्वागत केले. विजय वरुटे यांनी प्रास्ताविकात ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उत्तम पाटील यांचा ग्रुपतर्फे सत्कार झाला. उत्तम पाटील यांनी, युवकांनी व्यसनापासून दूर राहून समाजकार्याला वाहून घेण्याची आवाहन केले. यावेळी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दत्ता नाईक, रवी गुळगुळे, बाळासाहेब भोपळे, संजय मगदूम, गणेश जासूद, प्रेम बाचणे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, शिव शंभो ग्रुपचे सदस्य, उत्तम पाटील प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

निपाणी शहरात वळूंची थरारक झुंज

Spread the love  दुचाकींचे नुकसान ; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली निपाणी (वार्ता) : निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *