Monday , August 17 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाला ४.५९ लाखांचा निव्वळ नफा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक शेतकरी आणि संचालक मंडळांच्या सहकार्याने येथील अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.अहवाल साल अखेर सभासदांची संख्या ४१३ असल्याचे संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी सांगितले.
भागभांडवल एकूण एक १ लाख ८० हजार रूपये, निधी १९ लाख २६ हजार, ठेवी ३४.९९ लाख रुपये खेळते भांडवल २३ हजार ३००, हाती शिल्लक ३३ हजार रूपये इतके आहे. बँक शिल्लक १ लाख १०० रूपये, गुंतवणूक ५ लाख ८६ हजार रूपये, म्हैस खरेदीसाठी ४ लाख ४८ हजार रूपये कर्ज वितरण केले आहे.
बिनव्याजी कर्ज बिन व्याजी कर्ज २० लाख १९ हजार रुपये वितरण केले आहे.
म्हैशीचे दुध संकलन २ लाख १७ हजार १०० लिटर, गायीचे दुध संकलन ८८ हजार लिटर असून त्याची एकूण रक्कम १ एक कोटी ४४ लाख ८८ हजार सहाशे रूपये झाली आहे. ४ लाख ५९ हजाराचा नफा झाला आहे. दूध उत्पादकांना ६ लाख ४४ हजार रुपयांचा लाभांश दिल्याचे कवटे यांनी सांगितले. युवा उद्योजक अभिनंदन पाटील, सहकारत्न उत्तम पाटील यांच्यासह दूध संघाचे पदाधिकारी, संचालक सभासद, दूध उत्पादक आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी शहरात वळूंची थरारक झुंज

Spread the love  दुचाकींचे नुकसान ; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली निपाणी (वार्ता) : निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *