Monday , August 17 2026
Breaking News

मराठी भाषा संवर्धनासाठी महात्मा गांधी संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कवी संमेलन, काव्य लेखन कार्यशाळा, भाषण स्पर्धा, काव्य लेखन व काव्य वाचन, कथा कथन स्पर्धा, साहित्यिकांचे व्याख्यान, बोलीभाषा वृद्धींगत करण्यासाठी परिसंवाद, संत साहित्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी हरिपाठ पाठांतर व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेऊन अभिरुची निर्माण करणे, निबंध लेखन स्पर्धा घेऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देणे, अभ्यास व खेळासोबत विविध छंद जोपासता यावेत, ग्रंथ वाचनातून लिखाणाची प्रेरणा मिळेल, कविता, लेखातून व्यक्त व्हावे या उद्देशाने नवोदितांना प्रेरित करण्यासाठी या संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून व मार्गदर्शनातून आपली मायबोली अधिक प्रगल्भ बनेल.
ऐकणे, लिहिणं, वाचणं महत्त्वाचं आहे. दरवर्षी या उपक्रमांना विद्यार्थी व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभते तरी साहित्य प्रेमींनी अधिकाधिक संधी घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक, उपाध्यक्ष ऍड. नामदेव मोरे, सचिव सतीश जाधव, खजिनदार मनोहर मोरे, कवी शिवाजी शिंदे, प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *