Monday , August 17 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेच्या एनसीसी प्रमुख वैभवी दळवी उपस्थित होत्या. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी प्राणायाम, योगासनांचे वेगवेगळे प्रकार यांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, श्रीधर बेन्नाळकर, दत्ता पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सातवीच्या वर्गशिक्षिका स्नेहल बेळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाधारित भित्तीपत्रके तयार केली.
यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.‌

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *