
बेळगाव : बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरलेला अभंग गायनाचा भव्य कार्यक्रम नुकताच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मुख्य मंदिरातील श्री विठ्ठलाच्या समोरील सभाभवनात उत्साहात संपन्न झाला. बेळगाव गावातील किणये गावाचे श्री. शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निवडक 19 महिला भजन मंडळांतील एकूण 475 महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
सभा मंडपाच्या क्षमतेनुसार निवड करण्यात आलेल्या या महिला भगिनींच्या अभंग गायन कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज आणि त्यांचे शिष्य श्री धनंजय जवंजाळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंदिर ट्रस्टकडून परवानगी मिळाली. मंदिराच्या इतिहासात महिला भगिनींच्या सहभागाचा हा सर्वात मोठा अभंग गायन कार्यक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात रुपावलीने झाली. “गोड गोड तुझे नाम”, “गणेश शारदा”, “त्रिशुळावरी काशीपुरी”, “काय सांगू आता संतांचे उपकार” यांसह एकूण 15 अभंगांचे सुमधुर सादरीकरण करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
कार्यक्रमानंतर मंदिर परिसरातील भाविक, व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली. मुख्य मंदिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींनी अभंग गायन सादर केल्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असल्याचे अनेकांनी सांगितले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या 19 महिला भजन मंडळांमध्ये भक्ती संस्कृती महिला भजन मंडळ (श्रीराम मंदिर, बेळगाव), श्री विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ (कंग्राळी खुर्द), श्री माता भक्ती महिला भजन मंडळ (भारत नगर), मराठा जागृती निर्माण महिला भजन मंडळ (पटवर्धन लेआऊट, वडगाव), संत मुक्ताई महिला भजन मंडळ (भारत नगर, शहापूर), श्री जिव्हेश्वर महिला भजन मंडळ (श्री जिव्हेश्वर मंदिर, वडगाव), श्री ब्रह्मलिंग महिला भजन मंडळ (मजगाव), श्री रेणुका महिला भजन मंडळ (भाग्यनगर, अनगोळ), हरी ओम महिला भजन मंडळ (स्वामीनगर, मच्छे), श्री ज्ञानेश्वर महिला भजन मंडळ (श्री ज्ञानेश्वर मंदिर वडगाव), श्री दत्त दिगंबर महिला भजन मंडळ (राजाराम नगर उद्यान बाग), भजन संध्या महिला भजन मंडळ (गोंधळी गल्ली), मोरया महिला भजन मंडळ (चौगुले नगर मच्छे), श्री मंगाई महिला भजन मंडळ (ध.संभाजीनगर, वडगाव), आदिशक्ती महिला भजन मंडळ (अंबाबाई मंदिर, शहापूर), भावेश्वरी महिला भजन मंडळ सुळगा, येळ्ळूर), माऊली महिला भजन मंडळ( खादरवाडी), साईनाथ महिला भजन मंडळ (शांतीनगर टिळकवाडी), श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळ (श्री विठ्ठल मंदिर, वडगाव) या मंडळांचा समावेश होता.
याच वेळी समितीने प्रत्येक मंडळातील एका भगिनीचे सन्मान करण्यात आला.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे अक्षता कुलगटगी, रुक्मिणी निलजकर, लक्ष्मी काकतीकर, वर्षा बिर्जे, लक्ष्मी भादवणकर, सुवर्णा क्षीरसागर, छाया मजुकर, वर्षा निलजकर, रेणुका लाड, मनस्वी एलजी, ज्योती खानगावकर, मिलन पाटील, सुवर्णा लाड, नीता चंदगडकर, शारदा कल्पवृक्ष, पद्मा पाटील, लता पाटील, बिना ओदुगौडर, रूपाली सव्वाशेरी
या कार्यक्रमासाठी हार्मोनियम साथ शंकर लक्ष्मण पाटील (गुरुजी) यांनी केली. मृदंग साथ प्रेमजित (प्रमोद) पवार, अनिरुद्ध पवार व मनीष पवार यांनी तर तबला साथ सुदाम माळी, सर्वेश आनंद देसाई व दर्शन पिंगट यांनी दिली.
शंकर पाटील गुरुजी यांच्या 19 मंडळांचे प्रतिनिधित्व करत मनस्वी एलजी यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोल्हटकर यांनी केले. शेवटी शंकर पाटील गुरुजी यांनी सर्व सहभागी मंडळे, मंदिर समिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार मानले.
श्री. शंकर पाटील गुरुजींच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम बेळगावच्या महिला भजन परंपरेचे सामर्थ्य, श्री विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार ठरला.

Belgaum Varta Belgaum Varta