Monday , August 31 2026
Breaking News

कवी परशराम खेमणे उद्या गुंफणार कवी समजून घेतानाचे सहावे पुष्प

Spread the love

 

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने “कवी समजून घेताना – पुष्प सहावे” या उपक्रमांतर्गत कवी परशराम खेमणे यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “जगण्याचे पान” या शीर्षकाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात कवी परशराम खेमणे आपल्या कवितांमधील अनुभव, भावना आणि सर्जनशील प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. ते मुचंडी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जगण्याचे पान हा कवितासंग्रह प्रकाशित असून कवितांमधून भावगर्भ आशय मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. गझलच्या वळणावर जाणाऱ्या त्यांच्या रचना विशेष आवडणाऱ्या आहेत. ते स्थापनेपासून शब्दगंध कवी मंडळ संघाचे सदस्य आहेत.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित कवींचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले असून, विविध कवी आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीने कार्यक्रमाला समृद्ध करणार आहेत.
सदर कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मराठी विद्यानिकेतन, कॅम्प, बेळगाव येथे होणार आहे. साहित्यप्रेमी, कवी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या काव्यमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी आहेत. आयोजकांनी सर्व साहित्यप्रेमींना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *