Tuesday , June 23 2026
Breaking News

उचगाव येथे 28 एप्रिल रोजी बैलगाडी पळवण्याची जंगी शर्यत

Spread the love

 

उचगाव : येथील शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता एका बैल जोडीने रिकामी गाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे.
या शर्यतीचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि हर्षा शुगरचे मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काडाचे अध्यक्ष युवराज कदम अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
या शर्यतीसाठी पहिले बक्षीस 31 हजार रुपये, दुसरे बक्षीस पंचवीस हजार रुपये, तिसरे बक्षीस एकवीस हजार रुपये, चौथे बक्षिस वीस हजार रुपये पाचवे बक्षीस अठरा हजार रुपये, अशी एकूण 15 बक्षिसे असून हौशी बैलजोडी मालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा तसेच बैल जोडी मालकांनी या नंबरशी ९९८०३८५०१९, ९४४८७५८५७५, ७२५९४०५६१४ याचेशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा संवर्धनासाठी महात्मा गांधी संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *