Monday , August 31 2026
Breaking News

वादळी वाऱ्यामुळे माणकापूर शाळेचे नुकसान; सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केली पाहणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरात गुरुवारी (ता.२३) वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना तडे जाण्यासह छप्पर उडून गेली आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय माणकापूर येथे वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले आहे. तर शाळा खोल्यांच्या भिंतींना तडे जाण्यासह खिडक्या-दरवाजांची मोडतोड झाली आहे. त्याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सुदैवाने ही घटना सुट्टीच्या वेळेत घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शाळेच्या मोठ्या नुकसानीमुळे पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
याबाबतची माहिती त्यांनी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, तहसीलदार सुरेश मुंजे आणि गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांना दिली. याशिवाय या घटनेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून द्यावी. याशिवाय शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सण

Spread the love  निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात इंग्लिश मिडीयम शिक्षणाला मोठे महत्त्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *