Tuesday , June 23 2026
Breaking News

मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने कलमेश्वर हायस्कूलच्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने कलमेश्वर हायस्कूल, मण्णूरचा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भरत चौगुले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत सोसायटीच्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर कलमेश्वर हायस्कूलमधील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. कामिनी सोमनाथ कदम (88.8%) यांना 1000 रुपये व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांकाच्या कु. संपूर्णा लक्ष्मण काकतकर (83.2%) यांना 700 रुपये व स्मृतिचिन्ह. तृतीय क्रमांकाच्या कु. सर्वस्वी बाळू काकतकर (81.7%) यांना 500 रुपये तसेच स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री. आर. एम. चौगुले यांनी शुभेच्छापर भाषण करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मातोश्री सोसायटीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला व आर्थिक व्यवहारांची माहितीही उपस्थितांना दिली.
यावेळी उपाध्यक्ष सागर कटगेन्नावर, संचालक नारायण नाईक, शंकर सांबरेकर, सोमनाथ कांबळे, तसेच सल्लागार नारायण कालकुंद्री, नागेश चौगुले, नितीन कदम, मलाप्पा चौगुले, संदीप
डोनकर, महेश चौगुले, पालक सोमनाथ कदम, सौ. माधुरी कदम, सौ. रेखा लक्ष्मन कातकर, सौ. शोभा बाळू काकतकर उपस्थित होते.
कार्यक्रमास कलमेश्वर हायस्कूल सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार भरमा चौगुले यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *