
बेळगाव : अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित बेळगाव हिंदकेसरी किताबाच्या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन सोहळा आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटनप्रसंगी अनगोळ गावातील शेतकरी बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी मरगाई मंदीर येथे देवाची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गावातील कलमेश्वर मंदीर, गणपती मंदीर, मारूती मंदीर, भैरीदेव मंदिर, रामलिंग मंदीर, चव्हाटा मंदीर, महालक्ष्मी मंदिर, चव्हाटा मंदीर, सदानंद महाराज मठ येथे मिरवणूकीने पूजन करण्यात आले. यानंतर मरगाई मंदीर समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग प्रमुख श्री. उमेश कुऱ्याळकर तसेच उपस्थित शेतकरी बांधवांच्या हस्ते गाड्यांचे पुजन करण्यात आले. आणि शर्यतीला सुरवात करण्यात आली.

यावेळी उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यल्लाप्पा देमजी, गणपत साळुंखे, अरुण बेर्डे, प्रवीण कदम, नारायण शिंदोळकर, बाळू देवण, महावीर हणमण्णावर, शंकर जाधव, मल्लाप्पा होळकर, संजीव कडेमणी, जितेंद्र गुंडप्पणावर, बाबू सोमनाचे, रामा सोमनाचे, मुर्तीकार विजय सिमु, महादेव सोमणाचे, जोतिबा लाटुकर, रवी येळूरकर, महेश गौंडाडकर, फकीरा सोमनाचे, शंकर जाधव, बाबुराव धामणेकर, आप्पाजी धामणेकर, नेमिनाथ हणमण्णावर, मोनाप्पा सोमनाचे, संभाजी जाधव, बंडू हसबे, भोला कोलकार, रघु जाधव, मल्लाप्पा सांबरेकर, मोहन बडमंजी, गोपाळ सोमणाचे, विजय झिंगरूचे, हरि शिंदोळकर, शंकर सावंत, राजु चौगुले, महावीर हणमण्णावर, तसेच गावातील पंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta