Tuesday , June 23 2026
Breaking News

शहरातील 11 घरफोडी प्रकरणात पाच जणांना अटक; 67.9 लाखांचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील 11 घरफोडी प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील सुमारे 67.9 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.

बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हनुमाननगर, उज्वलनगर व अझमनगर येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपींसह चोरीचे सोन्याचे दागिने खरेदी करणारे दोघेजण अशा 5 जणांना गजाआड करण्यात आले आहे.

यापैकी चोरट्यांची नावे रिहान दफेदार, मलिक हुब्बळ्ळी व अरमान शेख अशी, तर सोने खरेदीदारांची नावे खलील हुब्बळ्ळी व शहानवाज पठाण अशी आहेत. आरोपींकडून चोरी केलेले 415 सोन्याचे दागिने, 1 किलो 300 ग्रॅम चांदी असा एकूण 67.9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या पद्धतीने माळमारुती, एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एकूण 11 घरफोडी प्रकरणांचा तपास लावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बोरसे यांनी पुढे दिली.

मागील दोन महिन्यांपूर्वी बंद असलेली 225 घरे चोरट्यांनी फोडली आहेत. याला आळा घालण्यासाठी घराला कुलूप लावून सहकुटुंब परगावी जाणाऱ्या नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांच्या घराच्या ठिकाणी पोलीस गस्त ठेवली जाईल. सध्या गेल्या दोन महिन्यात घरपोडीच्या घटना घडलेल्या नाहीत.

घरफोड्यांना आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची ‘लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम’ प्रणाली कार्यरत आहे, असे स्पष्ट करून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी चोरी प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पत्रकारांना वाचून दाखवली.
पत्रकार परिषदेप्रसंगी पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *