Monday , August 31 2026
Breaking News

बेळगावमध्ये ओढ्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बंबरगा गावाजवळ ओढ्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या हेल्पलाइन रेस्क्यू टीमने अत्यंत कमी वेळात मृतदेह पाण्याबाहेर काढून शोधमोहीम फत्ते केली.

आज दुपारी १२ च्या सुमारास बंबरगा गावाजवळील ओढ्यात करगुप्पी येथील रहिवासी बसवराज मारुती माळगी हे पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ‘हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन’चे (HERF) पथक बोटीसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.या पथकातील बसवराज हिरेमठ, सूरज राक्षे, कार्तिक पाटील आणि प्रकाश पाटील यांनी पद्धतशीरपणे शोधमोहीम राबवली. या सदस्यांच्या अथक परिश्रमांमुळे केवळ दोन तासांत बसवराज माळगी यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. मदत पथकाच्या या वेगवान कामगिरीमुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मोठी मदत झाली असून स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी या पथकाच्या साहसाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *