Sunday , June 7 2026
Breaking News

दहावीच्या गुणपत्रिकेवर मराठीचा उल्लेख टाळला; चूक लक्षात येताच यूटर्न

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकात आज दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षण खात्याचा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रिकेवर प्रथम भाषा मराठी असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. पण चूक लक्षात येताच शिक्षण खात्याने दुरुस्ती केली.

नुकताच जाहीर झालेल्या निकाल पत्रिकेत इंग्रजी आणि कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रिकेवर त्यांच्या प्रथम भाषेचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे परंतु मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र प्रथम भाषा विषयाच्या रखान्यात मराठी हा शब्द गहाळ करण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी विषयाचा कोड आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण नमूद करण्यात आले आहेत. मराठी भाषेबाबतच असा प्रकार घडल्यामुळे मराठी भाषिक पालक आणि विद्यार्थ्यांना तीव्र नाराजी पसरली आहे. दरवर्षी सीमाभागातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी एसएसएलसीची बोर्डाची परीक्षा देत असतात परंतु यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता मात्र यावेळी शिक्षण खात्याकडून झालेली चूक ही निंदनीय असल्याचे बोलले जात आहे. सदर बाब मराठी शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या निदर्शनास येतात त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत रीतसर तक्रार केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत सदर बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तात्काळ दुरुस्ती केली असून तांत्रिक अडचणीमुळे सदर चूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून सुधारित निकाल पत्रिकेवर मराठी भाषेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.

दरम्यान आज दहावीचा निकाल लागल्यानंतर संबंधित एस.एस.एल.सी. बोर्डाच्या संकेतस्थळावर मराठी माध्यमातील विद्यार्थांचा प्रथमभाषा मराठी विषय दिसत नव्हता, ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लीलावती हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून संबंधित विषयाची तक्रार नोंदवली, त्यावेळी त्यांनी बेंगलोर येथे सदर विषय कळविला असून पुढील काही तासात मराठी विषय संकेतस्थळावर उपलब्ध होईल असे आश्वासन दिले त्यानंतर काही वेळातच संबंधित संकेतस्थळावर मराठी विषय दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

व्हॅक्सिन डेपोमध्ये स्वच्छता मोहीम जारी

Spread the love  बेळगाव : व्हॅक्सीन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या समर्थ भारत प्रतिष्ठानच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *