Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : ‘मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतील २११ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला.
देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच गरज आहे. याच उद्देशाने शाळेने या दैदिप्यमान अशा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. आधार सोशल ट्रस्ट, धायरी (पुणे) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील स्वरा आलगोंडी या सहावीतील विद्यार्थिनीचा सोळा हजार शुभेच्छा पत्रातून उत्तेजनार्थ क्रमांक आला. शिक्षिका माधुरी पाटील व स्नेहल‌ पोटे यांनी प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारामध्ये शाल,प्रशस्तीपत्र , कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश होता. या यशाबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, स्पर्धा विभाग प्रमुख माया पाटील यांनी अभिनंदन केले. शाळेच्या वतीने हा उपक्रम मुख्याध्यापक बी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यात शिक्षिका दीप्ती कुलकर्णी, कमल पाटील, जयश्री पाटील, मुक्ता आलगोंडी, स्नेहल पोटे आदींनी सहभाग नोंदविला.

“आधार सोशल ट्रस्ट”ने फक्त कार्यक्रम नाही केला तर एक संस्कार घडवला आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे जवानांसाठी ग्रीटिंग कार्ड्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसंस्कार रुजवणारा, सैनिक व विद्यार्थी, शिक्षक पालक, संस्था यांना जोडणारा सेतू, देशभक्तीची ज्योत पेटवणारा, प्रेरणादायी सोहळाच होता. कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांच्यामुळे ज्ञान, संस्कार आणि साहित्यिक उंची लाभली असे आदरणीय एकनाथ आव्हाड यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते. या संस्थेचे संस्थापक ज्यांच्या या महान कार्यामागे ध्यास, स्वप्न व सामाजिक बांधिलकीतून हा महान कार्य उभा राहिला असे संतोष चाकणकर प्रेरणास्थान आहेत. बीएसएफLS

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …