Sunday , July 26 2026
Breaking News

राजहंसगडावर रंगणार थरारक गड चढणे–उतरणे स्पर्धा; ‘गडाचा राजा’ व ‘गडाची राणी’ किताबासाठी स्पर्धकांमध्ये चुरस

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंसगड (येळ्ळूरगड) येथे भव्य गड चढणे–उतरणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, यंदाही स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चुरस निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून,स्पर्धेला सुरुवात परमेश्वर नगर, इंदिरा कॉलनी येळ्ळूर येथून होणार आहे.
या स्पर्धेत लहान गटांपासून ते खुल्या गटापर्यंत विविध वयोगटांमध्ये स्पर्धा होणार असून, वय वर्षे ८, १२ व १६ खालील गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटात मुले व मुलींसाठी वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ८ वर्षांखालील गटात प्रथम १००० रुपये, द्वितीय ८०० रुपये व तृतीय ५०० रुपये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. १२ वर्षांखालील गटात प्रथम १५०० रुपये, द्वितीय १००० रुपये व तृतीय ५०० रुपये, तर १६ वर्षांखालील गटात प्रथम २००० रुपये, द्वितीय १५०० रुपये व तृतीय १००० रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे खुल्या पुरुष व महिला गटातील विजेत्यांना ‘गडाचा राजा’ आणि ‘गडाची राणी’ हा मानाचा किताब बहाल करण्यात येणार आहे. या गटात प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १००० रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी स्पर्धा स्थळीच, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन या ऐतिहासिक गडावर आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर (मो. 9739963229 ), स्पर्धा प्रमुख राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री किंवा श्रीकांत कदम(9611756529) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *