Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा 94.10 टक्के निकाल

Spread the love

 

बेंगळुरू : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा निकाल 94.10 इतका लागला असून यंदा कर्नाटक राज्याच्या निकालात उड्डपी जिल्हा आघाडीवर असून कलबुर्गी जिल्ह्याचा निकाल मात्र घसरला आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल देखील उत्तम लागला असून बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्यात 18 व्या क्रमांकावर आहे 30,860 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 29 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 94.75 इतका लागला आहे

दहावी परीक्षा ही प्रामुख्याने शालेय जीवनातील महत्त्वाची परीक्षा असते त्यानंतरच विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतो. यामुळे दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागला असून गतवर्षीच्या तुलनेत बेळगाव जिल्हा यावर्षी टक्केवारीत आघाडीवर आहे.
चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा व बेळगाव यांच्या निकालामध्ये दरवर्षी चुरस असते. यंदा मात्र निकालात बेळगाव जिल्ह्याने बाजी मारली असून चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याची टक्केवारी 94.09 इतकी आहे त्यानुसार चिकोडी जिल्हा 23 व्या क्रमांकावर आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 41560 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 39049 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या तुलनेत चिकोडी शैक्षणिक जिल्हा पाच क्रमांकाने पाठीमागे पडला आहे. कर्नाटक राज्यातून सात 770209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सात 724794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हिंदी भाषा विषयात ग्रेड देण्यात यावी यावरून निकाल लांबणीवर पडला होता. मात्र सालाबाद प्रमाणे गुण देऊन निकाल देण्यात यावा या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. 23 रोजी निकाल जाहीर होणार हे समजताच विद्यार्थ्यांना धाकधूक लागली होती मात्र यंदाचा दहावीचा निकाल पाहता चांगली असून यंदा संपूर्ण राज्याचा निकाल 94.10 इतका लागला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *