Sunday , September 20 2026
Breaking News

दहावीच्या परीक्षेत अथणीची प्रार्थना बिरादार राज्यात प्रथम

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अथणी तालुक्यातील कटगेरी येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अथणीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रार्थनाने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तिने सर्व विषयांत पैकीच्या पैकी म्हणजे ६२५ गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने सरकारी शाळेत शिकून मिळवलेल्या या यशामुळे सरकारी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील विविध केंद्रांवरून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. प्रार्थना बिरादार हिच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तिचे विशेष अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *