Sunday , July 26 2026
Breaking News

लिंगनूरच्या हरण्या- राजाने मारले ममदापूरचे मैदान

Spread the love

 

१.११ लाखाचे मिळविले बक्षीस : शिरूरची बैलगाडी ठरली द्वितीय

निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रेनिमित्त गुरुवारी (ता. २४) विविध शर्यती पार पडल्या. त्यामध्ये ‘अ’ गट जनरल बैलगाडी शर्यती मध्ये लिंगनूर (ता. कागल) येथील अजिंक्य कोपर्डे यांच्या हरण्या- राजा या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख १ लाख ११ हजार १११ रुपये, ढाल आणि ममदापूर केसरीचा किताब पटकवला.

या शर्यतीत शिरूरच्या बाळू हजारे यांच्या बैज्या-सुलतान या बैलजोडीने द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार १ रुपये व ढाल आणि आगळगाव परसू जाधव यांच्या नाग्या आणि बैजा या बैल जोडीने तृतीय क्रमांकाचे ५५ हजार १ बक्षीस मिळविले. जनरल बैलगाडी ‘ब,’ गट गशर्यतीत भिलवडीच्या राजेंद्र पाटील त्यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे ४१ हजार रुपये, बापू सरकार (डुबल) यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ३१ हजार रुपये आणि बेडगच्या विष्णू पाटील यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. जनरल घोडा- गाडी शर्यतीत मल्हार पाटील -येवती, चंदू नाईक- लिंगनूर आणि अनिकेत लोखंडे-कोगनोळी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे मिळवली. जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीत संभाजी खरात-सांगली, बंडा मगदूम मिरज, मारुती कागले- रुई यांच्या गाड्यांनी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये १० हजार रुपये, बिन दाती घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये गुंडू पाटील-अक्कोळ, हर्षल वाळके, रवी मंडले-मुडशिंगी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि पाच हजार रुपये, जनरल दुस्सा चौसा बैलगाडी शर्यतीत रणजीत गायकवाड, बंडा पवार- कुठोळी आणि बंडा खिलारे- दानोळी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे २० हजार रुपये,१५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे पटकाविली.
माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, रोहन कोठीवाले व मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. तर उद्योजक प्रवीणभाई शहा, ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, सदस्य निरंजन पाटील -सरकार, अक्षय पाटील, अनुप पाटील, मदन आवटे शंकर गावडे, निंगाप्पा गावडे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अमित जमादार डॉ. सुजय गोरवाडे, प्रवीण शिरगाव,सुरेश जमादार, विशाल पाटील, बाळासाहेब चौगुले, अंकुश आवटे, प्रसाद शिंदे यांच्यासह अंबिका देवी यात्रा कमिटी, ममदापूर केसरी शर्यत कमिटीचे कार्यकर्ते व शर्यती शौकीन उपस्थित होते.
——————————————————————–
पुढील वर्षी १.५१ लाखाचे बक्षीस
पुढील वर्षी अंबिका यात्रेनिमित्त चौथ्या वर्षी विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीतील अ गट बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयाचे पहिले बक्षीस देण्यात येणार असल्याचे उद्योजक प्रवीणभाई शहा यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *