Thursday , November 14 2024
Breaking News

निर्णयाच्या आश्वासनामुळे सैदापूर येथील रयतचे आंदोलन मागे

Spread the love

 

निर्णय होईपर्यंत कारखाना बंद : रयत संघटनेचा पुढाकार
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन 5500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सैदापूर येथील गोदावरी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी रयत संघटनेने आंदोलन केले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कारखान्यांच्या प्रमुखांची रयत संघटनेची चर्चा घडवून आणली. येत्या चार दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रयतचे आंदोलन मागे घेण्यात आले. चार निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्र्यांच्या कारखान्यांनी यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन 5500 रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण आज पर्यंत तोडगा न निघाल्याने बेळगाव जिल्ह्यात निरंतरपणे रयत संघटनेतर्फे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकर्‍यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी संघटित राहून रस्त्यावर उतरले तरच ऊसाला चांगला दर मिळणार आहे. एफआरपीच्या नावाखाली सरकार शेतकर्‍यांना लुटण्याचे तंत्र अवलंबले आहे. अतिवृष्टी, महापूर काळात पिकांचे नुकसान होऊनही निपक्षपातीपणे सर्वे न झाल्याने शेतकरी भरपाई पासून दूरच राहिला आहे. त्याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. त्यामुळे तात्काळ ऊस दराचा तोडगा काढण्यासह पिकांची भरपाई न दिल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय शेतकरी राहणार नसल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी यंदाच्या हंगामातील ऊस दराबद्दल कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर कारखान्याचे प्रमुख बक्षी यांच्याशी पोलीस यंत्रणावर रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची चर्चा घडवून आणली. चार दिवसात निर्णय देण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आश्वासनाचे पूर्तता न झाल्यास कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, बसवंत कांबळे, सुभाष शिरगूर, मल्लापा आंगडी, श्रीशेल आंगडी, शिवगोंडा पाटील, गंगाधर मेटी, सुभाष देवर्षी, चिनू कुळवमोडे, रोहन पाटील यांच्यासह शेतकरी व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली

Spread the love  कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *