खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांनी खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेची स्थापना केली.
यावेळी ग्रामपंचायत संघटनेच्या सदस्यांना तालुक्यातील सरकारी कार्यालयात भेट देऊन चौकशी करण्यासाठी ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
यासाठी ओळख पत्रक तयार करून खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण खानापूर शहरातील राम मंदिरात नुकताच करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुणगेकर याच्या अध्यक्षतेखाली सदस्यांना ओळख पत्राचे वितरण करण्यात आले
इदलहोंड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष चांगापा बाचोळकर यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुणगेकर, उपाध्यक्ष रणजीत पाटील, सदस्य संजय पाटील, उदय भोसले, नारायण पाटील, लक्ष्मण तिरवीर, चांगापा बाचोळकर, परशराम चौगुले, जोतिबा गुरव, अमोल बेळगावकर, भाऊराव पाटील, रमेश हंगीरगेकर, लक्ष्मण पारवाडकर, प्रवीण पाटील, सदस्या सावित्री मादार, हेमलता कोलकार आदी उपस्थित होते.