तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
सेनेगल : सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा अपघात सेंट्रल सेनेगलच्या कॅफरीन येथील गनीबी गावाजवळ झाला आहे.
सेनेगलचे राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती मॅकी सॉल म्हणाले, गनीबी गावाजवळ झालेल्या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण अस्पष्ट असून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तीन दिवसाचा दुखवटा जाहीर
राष्ट्रपतींनी सोमवारी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. तसेच रस्ते अपघात सुरक्षेविषयी लवकरच एका परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ते सुरक्षासाठीच्या ठोस उपाययोजनांसाठी 9 जानेवारीला बैठक होणार आहे.