बेळगाव : उत्तर कर्नाटक विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात नवोन्मेष (इनोव्हेशन) विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट मध्यवर्ती आहे. या परिषदेदररम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य सरकारने मागील काही वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आहे. तसेच उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल स्वतःचे विचार मांडले आहेत. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांचे बेळगावचा विकास तसेच येथील समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
सांबरा विमानतळावरील विमानोड्डाणे रद्द होण्याच्या घटना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच बेळगाव आणि परिसरातील विकासकामे तसेच महत्त्वपूर्ण औद्योगिक प्रकल्पासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडली आहे. यावेळी कोटा श्रीनिवास पुजारी, बसवराज होरट्टी, अरविंद बेल्लद आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला उत्तर कर्नाटकातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील जाणकारांनी हजेरी लावली होती.