Saturday , November 9 2024
Breaking News

ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटातील रघू हत्तीचा मृत्यू

Spread the love

 

धरमपुरी : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले बोमन आणि बेल्ली यांनी आपले रघू हे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले हत्तीचे पिलू गमावले आहे.

रघू 4 महिन्यांचा होता तेव्हा कळपापासून वेगळा पडला होता. बोमन आणि बेल्ली यांनी त्यांचा सांभाळ केला. वरचे दूध पचवू न शकल्याने या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. 9 मार्च रोजी कर्नाटकमधील धरमपुरी येथील एका विहिरीत हे पिल्लू आढळले होते. वनपशुवैद्यक आणि धरमपुरीतील रहिवासी बोमन आणि बेल्ली या दांपत्याने या पिल्लाची जबाबदारी घेतली होती. गुरुवारी दुपारपर्यंत ते बरे होते. सायंकाळनंतर त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. पशुवैद्यकीय पथकाने उपचार केले. पण, मध्यरात्री 1 च्या सुमारास रघूचा अखेर मृत्यू झाला.

हत्ती आणि मानवाचे नाते
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा लघूपट हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या बमन आणि बेला या दाम्पत्यावर आधारित आहे. लघूपटाची कथा ही हत्ती आणि त्याच्या मालकाशी असलेल्या प्रेमावर असून, निसर्गाशी जोडताना दिसत आहे. लघूपटात दोघांमध्ये असलेल्या भावनिक नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ते लोक आपल्या हत्तींशी कस खेळतात, दंगामस्ती करतात, त्याचबरोबर त्या मालकाची पत्नीही यात हत्तींशी खेळताना संवाद करताना दिसत आहे. हत्ती आणि बमन आणि बेला यांच भावनिक नात्याचं चित्रीकरण दाखवण्यात आलं आहे. हा भावनिक बंध प्रेक्षकांना प्रभावित करतो.

माहितीपटाच्या कथेची सुरुवात निसर्गरम्य दृश्यांनी होते, त्यानंतर बोमन आपला हत्ती रघूला आंघोळीसाठी नदीवर घेऊन जातो. या चित्रपटात बोमन आणि हत्ती रघू यांच्यातील नाते दाखवण्यात आले आहे. बामन सांगतो की, त्याला जंगलात रघू जखमी अवस्थेत आढळला. तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. रघूची त्याच्या कळपाशी ओळख करून देण्याचा खूप प्रयत्न केला जातो; पण सर्व प्रयत्न अयशस्वी होतात.

हत्तींच्या बाळाची काळजी घेण्यासाठी बेलाची निवड
यादरम्यान, बोमनने बेलाची निवड हत्तींच्या बाळाची काळजी घेण्यासाठी केली गेली होती. ती एकमेव महिला आहे जी हत्तींची काळजी घेणारी होती. या लघुपटात प्राणी आणि हत्तींवरील प्रेम, त्या हत्तींना सोडून दिल्यावर आणि त्यांच्या कळपापासून वेगळे झाल्यानंतर त्यांची कशी काळजी घेतली जाते हे दाखवण्यात आले आहे. रघु आणि अम्मू यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी गळ्यात घंटा घातली आहे. जेणेकरून ते जंगलात कुठेतरी हरवले तर सहज सापडतील. रघूचा एक मित्रही आहे, त्याचे नाव कृष्ण आहे. कृष्णा आणि रघु संपूर्ण वेळ मजा करतात आणि दोघेही एकमेकांना साथ देतात.

या चित्रपटाची संपूर्ण कथा हत्तींभोवती फिरते. बामन आणि रघू यांच्यातील एक सुंदर बंध दाखवला आहे. दरम्यान, जंगलात आग देखील लागते, ज्यामध्ये जवळपास सर्व हत्तींचा मृत्यू झाला आणि एक लहान हत्तीण वाचते. ज्यांना बोमन आणि बेला दत्तक घेतात आणि त्यांची काळजी घेतात. जोडप्याचा सगळा वेळ त्यांच्या संगोपन करण्यात जातो. रघू आणि हत्तीचे मुल अम्मू यांच्यातील बंधही घट्ट होत जातो. दरम्यान, बोमन आणि बेलीचेही लग्न होते. नंतर रघूला दुसऱ्याच्या हवाली केले जाते, त्यामुळे अम्मू बराच काळ उदास राहतो. त्यानंतर, ती हळूहळू बरी होते आणि जोडपे अम्मूची काळजी घेण्यास परत येते.

About Belgaum Varta

Check Also

राजस्थानात बसचा भीषण अपघात; १२ प्रवाशांचा मृत्यू

Spread the love  सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *