Monday , December 23 2024
Breaking News

आयपीएलचा कोण होणार चॅम्पियन? गुजरात की चेन्नई

Spread the love

 

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा महाअंतिम सामना आज (रविवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचे नेतृत्व कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनी करणार आहे, तर गुजरातची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहेे. आयपीएलचा उद्घाटनाचा सामना या दोन संघांमध्येच रंगला होता. आता शेवटची त्यांच्या लढतीनेच होत आहे. गुरू-शिष्याच्या या लढाईत कोण बाजी मारणार, हे आज कळणार आहे.

सीएसकेचा संघ 14 पैकी दहा वेळा अंतिम सामना खेळण्यास उतरली आहे. दोन वर्षे हा संघ बंदीमुळे स्पर्धेत सहभागी नव्हता. गुजरात जायंटसचा संघ गेल्यावर्षी नवीनच स्पर्धेत सहभागी झाला अन् थेट विजेता बनला. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीच्या गुणतालिकेत गुजरात 20 गुणांसह टॉपवर राहिले तर चेन्नई 17 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर होते; परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईकडून गुजरातचा पराभव झाला म्हणून त्यांना क्वालिफायर-2 सामना खेळावा लागला. यात त्यांनी मुंबईला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला.

सामना न झाल्यास कोण विजयी ठरेल?
आयपीएल फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीतील गुणांच्या आधारे विजयी संघ ठरवला जाईल. असे झाल्यास 20 गुणांसह टॉपर राहिलेल्या गुजरात टायटन्सकडे जेतेपदाची ट्रॉफी कायम राहील.

शुभमन गिलवर असेल नजर
गुजरातला अंतिम फेरीपयर्र्ंत पोहोचवण्यात सलामीवीर शुभमन गिल याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या शतकाच्या जोरावर गुजरातने मुंबईला हरवले होते. धोनीच्या चाणाक्ष डोक्यातून शुभमनसाठी कोणते प्लॅन बाहेर पडतात ते पहावे लागेल. गुजरात टायटन्स हे घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

आज पुन्हा पावसाची शक्यता
अहमदाबादमध्ये कडक उन्हाळा जाणवत असूनही शुक्रवारी दुपारनंतर पाऊस झाला. त्यामुळे सामना उशिरा सुरू झाला. पण याचा कोणताही परिणाम खेळावर झाला नाही. फायनल सामन्यावरही पावसाचा अंदाज आहे. अ‍ॅक्युवेदर या संकेतस्थळाने दिलेल्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता 49 टक्के आहे आणि जसजसा सामना पुढे सरकेल तशी ही शक्यता 68 टक्क्यांपर्यंत जाईल. म्हणजे सामना 20 पेक्षा कमी षटकांचा होण्याचा अंदाज आहे. जर पावसाचा जोर वाढला तर मॅच रद्दही केली जाऊ शकते.

About Belgaum Varta

Check Also

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

Spread the love  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *