Thursday , September 19 2024
Breaking News

तेऊरवाडीत ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत केली भात रोप लावणी

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली. ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालूक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल ते राव काय करेल? याची प्रचिती तेऊरवाडी करानी या श्रमदानातून दाखवून दिली.
येथील श्री ब्रम्हदेव देवस्थान कमिटीच्या ताब्यात जवळपास पाच एकर हुलकाई देवीचे शेत आहे. यापूर्वी हे शेत खंडाने विविध शेतकऱ्यांसाठी दिले जात होते. पण सध्या या परिसरात गव्यांच्या वाढता वावर, शेतीचा वाढता खर्च व शेत मजुरांची कमतरता यामूळे शेत करण्यास कोण तयार होत नव्हते. यानंतर देवस्थान
कमिटीने गावच्या श्रमदानातून ही शेती कसण्याचा गतवर्षी निर्णय घेऊन त्याची अंमल बजावणीही केली. आज पुन्हा गावामध्ये पाळक करून संपूर्ण गावातील प्रत्येक घरोघरी स्त्री, पुरुष, युवक यांच्या सहकार्यातून रोप लागण करण्यात आली. यासाठी बैलानी चिखल करण्यात आला. काहीनी रोप काढली, काहीनी भाताच्या पेंड्या पुरवल्या, दोघ – तिघानी वरखत टाकले, काहीणी शेतात पाणी पुरवठा करण्याचे तर महिलांनी तरु काढून तीची लागण करण्याचे काम केले. एकमेकांच्या सहका यातून पारंपारिक गिते गायन करत तीन तासात रोपलागन संपवण्यात आली. एकीचे बळ सर्व श्रेष्ठ असल्याचे या घटनेतून दिसून येते.
शेवटी एकत्रितपणे मांसाहारी व शाकाहारी जेवणावर ताव मारण्यात आला.

पावणेराची आठवण

तेऊरवाडीत पूर्वी पावणेर करायची परंपरा होती. पावणेर म्हणजे कोणतेही कोणाचेही काम गावातील ग्रामस्थांनी जाऊन विनामूल्य करणे. फक्त याचा मोबदला म्हणून ज्याचे काम आहे त्याने सायंकाळी जेवण देण्याची प्रथा होती. यामध्ये बैलानी शेत जमिन बसवणे, गवत कापणे -आणणे, मळणे, शेण किट कालवणे, खत वढवणे, घर बांधणे, लाकडे आणणे आदि कामे विनामूल्य केली जात पण आता माणूसकी संपत असताना सर्वच कामामध्ये पैशांची देवघेव होते. त्यामुळे पावणेर हा प्रकार बंद पडला. पण तेऊरवाडी करांनी आज पुन्हा पावणेर प्रथा जपून सर्वाना आनंदाचा धक्का दिला.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *