जिल्हास्तरीय परिषदेत पाच शाळांमधून १३० माता सहभागी
बेळगाव : मातृभारती संस्थेची जिल्हास्तरीय परिषद संतमीरा शाळेमध्ये झाली. यामध्ये पाच शाळांमधून १३० माता सहभागी झाल्या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. त्यांनी नैसर्गिक व्यक्तिमत्त्व विकास, आहार आणि वेळेचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. तृप्ती हिरेमठ यांनी घर ही पहिली शाळा असून आई ही पहिली गुरु आहे, असे सांगितले.
प्रिया पुराणिक यांनी अध्यक्षीय समारोप केला. याचवेळी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मातृभारती प्रांत संमेलनाची माहिती देण्यात आली. अमृत पेटकर, रिता डोंगरी यांनी प्रार्थना म्हटली. अरुणा पुरोहित यांनी स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सरोजा कटगेरी यांनी केले. भाग्यश्री शब्दी यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्याभारतीचे प्रांताध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नायक, सहसचिव सुजाता दप्तरदार, शाळा प्रशासन अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विणा जोशी, सविता पाटणकर, सीमा कामत यांचे सहकार्य लाभले.