निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू खाटीक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या निर्णयाचे सीमा भागातील खाटीक समाजातर्फे स्वागत करण्यात येत असल्याचे पत्र माजी सभापती राजांची कोडे यांनी दिले आहे.
पत्रकातील माहिती अशी, कर्नाटकातील खाटीक समाज अनेक वर्षे आपल्या पिढ्यान पिढ्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मागासलेल्या समाजाची सुधारणा करण्यासाठी विविध स्तरावरुन मागणी अनेक वर्षे करीत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन राज्यातील खाटीक समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील व सीमाभागातील खाटीक समाजात समाधानाचे वातावरण पसरले आहे. याबद्दल कर्नाटकाचे मुख्यमंत्री व राज्यातील सर्व मंत्री मंडळाला धन्यवाद देणारे पत्रक महाराष्ट्र कर्नाटक हिंदू खाटीक महासंघाचे वतीने प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्ध केले आहे.