श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात परिसरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौंड मध्ये आदिशक्तीच्या जागर सुरू असून त्याला धारकऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शुक्रवारी (ता.२०) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन संजय साळुंखे व ध्वज आणि शस्त्र पूजन अवधूत देशपांडे यांच्या हस्ते करून ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडला सुरवात करण्यात आली. तिथून श्री दुर्गामाता दौड निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. निपाणकर वाड्यातील आदिशक्ती जगदंबेची आरती उपेंद्र मुळीक यांच्या हस्ते करून श्री दुर्गामाता दौड दिवेकर कॉलनीकडे मार्गस्थ झाली. तिथून दुर्गामाता दौड गिजवणेकर कॉलनी, बडमंजी प्लॉट, रोहिणीनगर, लेटेक्स कॉलनी, छत्रपती शिवाजी नगर परिसरामध्ये भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर शिव शंभू जयघोषणे दुमदूमला होता. तिथून श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौककडे मार्गस्थ झाली. प्रेरणा मंत्राने श्री दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली.
यावेळी उमेश भिसे, गणेश भिसे, विजय खराडे, गौतम रावण, ओमकार व्हडगे, प्रसाद कुंभार, पार्थ गिजवणेकर, अतिश चव्हाण, आकाश गोंधळी, प्रथमेश गोंधळी, विनायक बाचणे, शीतल मिरजे यांच्यासह मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थिती होते.