Tuesday , September 17 2024
Breaking News

युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने बेळगावात निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुकडोळी गावातील दलित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी काही सवर्ण शेतकरी प्रतिबंध करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

कुकडोळी गावातील सर्व्हे नं.16,17,18,19,11 या दलित समाजातील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत, काही सवर्ण जमीनदार त्यांना आपल्या शेतात जाण्यास प्रतिबंध करत असल्याने त्यांना हिवाळ्यात व पावसाळ्यात शेतात जाण्यास खूप त्रास होतो. त्याच्या निषेधार्थ युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी बोलताना युवा कर्नाटक भीमसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय के.आर. यांनी सांगितले की, दलितांना पावसाळ्यात, हिवाळ्यात शेतात जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. रोज दुसऱ्याच्या शेतातून 2-3 किमीची पायपीट करत फिरावे लागत आहे. शेजारी अनेक शेतकरी सवर्ण आहेत. दलित समाजातील लोक त्यांच्या जमिनीतून जात असताना ते अनाठायी जातीवाचक शिवीगाळ करतात.आमच्या वडिलधाऱ्यांच्या काळापासून सर्व्हे क्रमांक 10 वर अनेक वर्षे चाकांची व इतर वाहने शेतीची कामे आणि पिकांची वाहतूक करण्यासाठी जात असत. आता शाहिस्ता महमद इकबाल अन्सारी, सर्व्हे क्रमांक 10 चे जमीन मालक आहेत. बिहारी लोक शेताच्या वाटेवर एक मोठा खड्डा खोदून वाट बंद करत आहेत. ०१/०२/२३ रोजी आम्ही सर्व संबंधित विभागांना आवाहन केले होते, मात्र त्यानंतर एकाही अधिकाऱ्याने जागेची पाहणी केली नाही. कर्नाटक सरकारच्या परिपत्रकात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्यासाठी खासगी जमिनींवर वाट, बैलगाड्या जाण्याची सुविधा देण्यात यावी. अनेक दलित समाजातील जमीनदारांवर अन्याय होत असल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून दलित समाजातील शेतकऱ्यांना मदत करावी व त्रास देणाऱ्यांवर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा कर्नाटक भीम सेना राज्य कमिटीतर्फे करण्यात येत आहे.

यावेळी युवा कर्नाटक भीमसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय के.आर., प्रदेश सरचिटणीस मलप्पा अक्कमडी, प्रदेश सहसचिव अजेय, प्रदेश कोषाध्यक्ष निखिल कोलकार, शिंगे, प्रदेश सचिव प्रमोद मरनायक, दिपक कांबळे, नईमा मुजावर, बैलहोंगल तालुकाध्यक्ष उदय बसोजी, अध्यक्ष मादारस पाटील, सचिन कोलकार, हरीश इराणी, बैलहोंगल तालुका सरचिटणीस राहुल दोड्डयल्लापागोळ, बेळगाव तालुकाध्यक्ष राकेश शिंगे, बेळगाव तालुका उपाध्यक्ष प्रमोद शिंगे, बेळगाव तालुका सरचिटणीस दिलीप कोलकार व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *