बेळगाव : बेळगुंदी येथील मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या गिल्बर्ट डायस (56) यांचा मृत्यदेह विहिरीत तरंगताना आज शेतकर्यांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती पोलिसाना देण्यात आली. गावाजवळील शेतातील विहिरीत मृत्यदेह सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. गिल्बर्ट डायस हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शुक्रवारी (ता.24) बेळगुंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.